पि पीसीन्यूज; अजय जाधव
हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमा विरुद्ध वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई पालवे यांना गुन्ह्यात चोरीस गेलेली जुपिटर गाडी चोरणारे चोरटे शिवाजी चौक हिंजवडी येथे येणार असल्याची खबर मिळाली. हिंजवडी पोलिसांतर्फे शिवाजी चौक येथे नाकाबंदी करण्यात आली. नाका-बंदी दोन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपी अजय आनंद भोसले वय वीस वर्षे राहणार हुलावळे वस्ती हिंजवडी पुणे मुळगाव तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद व उल्हास विठ्ठल मोरे वय23 राहणार फुगे बिल्डिंग फुगेवाडी पुणे मुळगाव सोलापूर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. एमक्युअर फार्मास्युटीकल कंपनी हिंजवडी फसे टू गेट समोरून टीव्हीएस कंपनीची जुपिटर गाडी चोरल्याची कबुली दिली सदर आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील पंचवीस हजार किमतीची मोटरसायकल जप्त केली. तसेच तपासादरम्यान त्यांनी वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरून नेलेली एक हिरो होंडा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून ४०हजार किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
दुसर्या एका हिंजवडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात आरोपी सौरभ शंकर भांडवलकर वय २४ राहणार गणेश नगर पिंपळे सौदागर आणि परमेश्वर उर्फ मनोज शिवाजी सूर्यवंशी वय २० राहणार शिवाजी भिलारे यांच्या घरी भाड्यानेयांना अटक करून त्यांच्याकडून ४०हजार किमतीच्या दोन मोटारसायकली व ७हजार किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी माननीय कृष्णप्रकाश पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त, सुधीर हिरेमठ पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, विनायक ढाकणे पोलीस उपायुक्त परि- २, श्रीधर माधव सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड, यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस स्टेशन, अजय जोगदंड पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर काटेसहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास पथकातील कर्मचारी यांनी केली.
![सराईत वाहनचोर गजाआड हिंजवडी पोलिसांची कारवाई.](https://ppcnews.in/wp-content/uploads/2020/09/IMG-20200907-WA0032.jpg)
सराईत वाहनचोर गजाआड हिंजवडी पोलिसांची कारवाई.
Share this: