महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे मार्फत कोव्हीड-१९ या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या निर्देशांनुसार कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि.१८/०५/२०२१ ते २०/०५/२०२१ या काळात दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक १८ मे २०२१ रोजी “GST आणि त्याचे महत्त्व” या विषयावर श्री. विद्याधर गायकवाड. (सहाय्यक आयुक्त, GST,मुंबई), यांच्या मार्फत व्याख्यान देण्यात येणार आहे. तसेच दिनांक १९ मे २०२१ रोजी “Business Incubator म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, कार्ये, व Basic Mechanics of Starting Incubator Center. या विषयावर श्री. चक्रधर दोडके (संचालक,मास्टर स्ट्रोक प्लस,नागपूर, Mentor, BEDC, सदस्य Bombay Productivity Council व माजी सहा.संचालक भारत सरकार Ministry of MSME, हे व्याख्यान देतील व दिनांक २० मे २०२१ रोजी “उद्योजकता विकास व शासकिय योजना” या विषयावर श्री. गणेश खामगळ. (संचालक, मिटकोंन,पुणे) हे व्याख्यान देणार आहे.
सदर कार्यक्रम झूम मिटिंग द्वारे आयोजित करण्यात आला आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आय.डी. : ८७२४१६३३७७१ व पासवर्ड : १२३४ चा वापर करावा. तसेच सदर कार्यक्रम बार्टीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह (LIVE) वरून सुद्धा सहभागी होता येईल, त्याची लिंक https://www.facebook.com/BARTIConnect आहे. तसेच या कार्यक्रमांचे पुनःप्रक्षेपण त्याच दिवशी युट्यूबद्वारे बार्टीच्या ऑनलाईन (Barti Online Channel) चॅनेलवरून सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित करण्यात येईल. तरी महाराष्ट्रातील नव उद्योजकांना तथा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी सदर कार्यक्रमाचा लाभ घावा असे आवाहन बार्टी, संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन
Share this: