पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर (आण्णा)मोहोळ व जनसेवक दिनेश माथवड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहरातील कष्टकरी गटई कामगार व मोलमजुरी करणारया व गरजु समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट, मास्क आणि किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघ आणि संस्थेचे संस्थापक विश्वस्त निलेश (आण्णा) सोनवणे यांच्या सहकार्यातुन हे वाटप करण्यात आले. यावेळी, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव पोटे, सचिव जयदेव इसवे, खजिनदार रविराज खरात, महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष नितिन कडू, पुणे शहर अध्यक्ष किशोर पवार व पुणे युवक अध्यक्ष सत्यजीत जाधव, राजेश कदम, किरण चौगुले आणि विनायक जाधव यांनी जीवनावश्यक किराणा वस्तू समाजातिल कष्टकरी गटई व गोरगरिब, मोलमजुरी करणाऱ्यांच्या घरपोच वाटपाचे नियोजन केले.
तसेच चर्मकार समाजातिल गटई कामगारांना आपतकालीन आर्थिक मदत त्वरित मिळण्यात यावी यासाठीचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौर यांना देण्यात आले.
कोरोना लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ जनजीवन ठप्प झाल्यामुळे माता, भगिनी यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सामाजिक जबाबदारीचे भान बाळगत राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला समाजातिल दानशुर व्यक्तींना जीवनावश्यक वस्तु अथवा आर्थिक स्वरूपात काही मदत करायची असल्यास पुढील नंबरवर संपर्क साधवा निलेश (आण्णा) सोनवणे
8600005005. संघटनेचे सर्व विश्वस्त, पदधिकारी सदस्य मोठ्या कष्टाने व हिमतीने जीवनावश्यक वस्तू किराणा वाटप व्यवस्थेची व नियोजनाची जबाबदारी कोरोनाचे नियम पाळून पार पाडत आहेत.