पि पी सी न्यूज; प्रतिनिधि अजय जाधव!– सांगवी येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणावर गोळीबार झाला आहे. सांगवी परिसरात असलेल्या कातेपूरम चौकात ही घटना घडली आहे. या गोळीबारात पीडित तरुणाचा मृत्यू झाला आहे.अज्ञाताकडून गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथील कातेपूरम येथे सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तरुणावर गोळीबार करुन आरोपीने पळ काढला आहे.
या घटनेत पीडित तरुण जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव योगेश जगताप असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यामागचं कारण काय? या हल्ल्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
मात्र, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाजातून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळातच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.




















































