पीपीसी न्यूज प्रतिनिधी: अजय जाधव!
८मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आदरणीय विजयानंद पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आणि प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी आरोग्याविषय उपक्रमांतर्गत मधुमेह तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले. शिवाजीनगर येथील जनवाडी, गोखलेनगर, वडारवाडी, कस्तुरबा वसाहत, इंदिरा वसाहत, औंधगाव,पाषाण, बोपोडी भागातील 350 महिला भगिनींनी उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घेतला. महिला सुरक्षा सोबतच महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत त्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारे चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय विजयानंद पाटील सर यांचे आणि कार्यक्रमास विशेष सहाय्य करणारे पोलिस उपनिरीक्षक दिनेश गडांकुश सर, महिला निरीक्षक स्नेहल पाटील मॅडम, मनिषा जाधव मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांचे जमलेल्या महिलांनी मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमास अनेक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहात महिलांना शुभेच्छा दिल्या.




















































