मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. यानंतर अनेक भागांत पुन्हा अधिक गर्दी दिसू लागल्यानं गर्दी करू नका, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन सारखी वेळ येईल, अशा संदर्भात उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन बाबत ट्विटरवरून सांगितले की, ‘लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.’
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान केलेल्या विनंतीला पुन्हा लॉकडाऊन होणार अशा स्वरूपात काही जणांनी पसरवले आणि जनतेत संभ्रम निर्माण केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी तातडीने खुलासा करून ‘लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही’, असे जाहीर करून संभ्रम दूर केला आहे.
लॉक डाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Share this: