महाराष्ट्रावर कोसळलेल्या कोरोना नावाच्या शत्रूसोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महायुद्ध छेडले आहे. या महायुद्धात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या महायुद्धात आम्ही अखेरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठपणे उभे राहू, असा निर्धार शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक हरेश नखाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हरेश नखाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज काळेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, अनिता तुतारे, शिल्पा आनपन, युवा नेते देविदास नखाते, नगरसेवक बाबा त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, प्रहार संघटनेचे संजय गायके, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, ऍड. चंद्रकांत गायकवाड, पद्माकर जांभळे, नेताजी नखाते, प्रविण केमसे, ऍड.राजेंद्र गोळे हे उपस्थित होते.
दरम्यान, या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी तसेच महिला रणरागिनींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी नियोजित वेळेमध्ये ३५ जणांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदिप दळवी, गणेश आहेर, गणेश वायभट, बाळासाहेब येडे, अंकुश कोळेकर, दत्ता गिरी, रवि घटकर, प्रजाक नढे, अनिकेत मुंगसे, विराज बोडके, हर्षद काटे, साहिल राऊत, अजित सांळुके,हेमंत शिंदे या शिवसैनिकांनी प्रयत्न केले. तर वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या स्टाफने सहकार्य केले.





















































