प्रतिनिधी, (ppcnews.in)
पुणे… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्वती विधानसभा उपाध्यक्ष श्री. संकेत शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि नेहरू बाल विकास संघ व जिद्द फाऊंडेशन यांच्या सहकाऱ्याने मोफत भव्य आरोग्य शिबिर, रक्तदान व कर्ज मेळावा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडला.
सदर कार्यक्रमात डोळे तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, इसीजी, रक्तदान, कर्ज मेळावा आदींचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन मराठवाडा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अरुण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. धनंजय देशपांडे, श्री. प्रकाश बाफना, प्रा. भिमराव अडसूळ, प्रा. राजेंद्र जोशी, ICICI बँकेचे शाखा व्यवस्थापक जयंत हिरे, रोटरी क्लबच्या सरिता चितोडकर, श्री. संजय शिंदे, नेहरु बाल विकास संघाचे अध्यक्ष अभिषेक गजरमल , गजानन लोंढे, राहुल गुंड आणि कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष व जिद्द फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष संकेत संजय शिंदे यांनी केले होते.




















































