पिंपरी चिंचवड (ppcnews.in):
डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार व जेष्ठ मार्गदर्शक विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते शहराध्यक्षपदी सुरज राक्षे व उपाध्यक्षपदी गणेश मुळे निवड करण्यात आली.
सुरज राक्षे यांच्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे, व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती पिंपरी चिंचवड शहरांमध्ये उत्सामध्ये साजरी करण्यासाठी अग्रेसर भूमिकांनी निभवणारे, वृक्ष वाटप ,स्वच्छता मोहीम अशा विविध कार्याची दखल घेऊन डेबुजी ब्रिगेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार यांनी सुरज राक्षे यांची डेबुजी युथ ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी निवड जाहीर केली. राहुल वरणकार म्हणाले की सुरज राक्षे यांचे सामाजिक कार्य व समाजाप्रती चांगल्या प्रकारे योगदान आहे .येणाऱ्या काळात सुरज राक्षेव गणेश मुळे यांनी डेबुजी युथ ब्रिगेड या संघटनेचे वाढ करून सर्वसामान्य समाज बांधवाला न्याय देण्याची भूमिका व अन्यायाविरुद्ध समाज बांधवांच्या पाठीमागे उभे राहावे असे मत वरणकर यांनी व्यक्त केले .या निवडीची सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहआहे
यावेळी उपस्थित ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार मार्गदर्शक विश्वनाथ जी राऊत ,मंकिता माखन ,गणेश मुळे,ज्ञानेश्वर मुळे, रमेश भालेकर,फकीरा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी खडसे राहुल सावंत अनिकेत साळवे, संतोष गोतावळे व समाज बांधव उपस्थित होते





















































