सांगवी | प्रतिनिधी
सांगवी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी व सेवा सेतू संकल्प ट्रस्ट यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एक वेगळ्या, वैचारिक आणि समाजप्रबोधनात्मक पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
फक्त अभिवादनापुरती मर्यादा न ठेवता, या उपक्रमातून “विचारांची क्रांती” घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी “जातीव्यवस्था निर्मूलन”, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषण तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकीरा’ यांसारखी प्रेरणादायी पुस्तके नागरिकांना वाटप करण्यात आली. “विचारांचा वारसा घराघरात पोहोचवणे” हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

आजच्या पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ जयंती साजरी न करता विचारांची ज्योत प्रज्वलित करण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न ठरला.
हा उपक्रम केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रेरणेने तसेच आमदार शंकर जगताप, प्रशांत शितोळे आणि शहराध्यक्ष नगरसेवक कुणाल भाऊ वाव्हळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडला.
या प्रसंगी डॉ. धम्मरत्न गायकवाड, राहुल निटनवरे, निखिल केंगले, दिलीप मोरे, तेजस सुरते, क्रांतिदीप जाधव यांच्यासह युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“वंदना नव्हे, विचारांचा प्रसार — हाच खरा बाबासाहेबांना अभिवादन!”



















































