पुणेः- राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह ‘मिनी लॉकडाऊन’ चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत पुण्यात लॉकडाउन न करता निर्बंध कडक करण्याकडे कल आहे. वेगवेगळ्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी लॉकडाउन न करता निर्बंध कडक करावेत असं मत व्यक्त केल आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटरसह पीएमपीएमपीएलची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे, कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील. त्याचबरोबर संध्याकाळी सहा ते पहाटे सहावाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी लागू झाली आहे.