मुंबई :- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात मागील २४ तासांत तब्बल ४३,१८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामुळे मुख्यामंत्री ठाकरे लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to chair a high-level meeting with officials today, over the #COVID19 situation in the state. pic.twitter.com/tyLkkoGeVo
— ANI (@ANI) April 2, 2021
राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. मुख्यंमत्री ठाकरेंनी बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठक काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.