पुणेः- डाॅ. बाबसाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ‘डाॅ बाबसाहेब आंबेडकर’ पुस्तिका अभिवादक व लहान मुलांना आज देण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्ष श्री भाग्यदेव एकनाथ घुले दत्तात्रय (बाळु) घुले नितिन धिवार नंदु घुले नामदेव गोळे मारुती मोरे दत्ता घुले रोहिदास जोशी सुरेश शिंदे दिलिप घुले प्रल्हाद घुले अशोक वहिले आदि उपस्थित होते.
उपक्रमा बद्दल माहीती देताना भाग्यदेव एकनाथ घुले यांनी सांगितले की, डाॅ. बाबासाहेबांनी देशाला मुख्यत्वे मानवतेवर व सामाजिक समतेवर आधारित संविधान बहाल केले व देशाला नवी कायदेशीर वाटचाल दिली, जीवनमुल्ये दिली व शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश युवा पिढीला दिला.
बाबासाहेबांना वाचनाची विशेष आवड होती ते खुप पुस्तके वाचत व त्यांच्या जीवनात वाचनाला व अभ्यासाला खुपच महत्व होते, आजच्या पिढीने सुध्दा सखाेल पणे वाचावे व युवा पिढीला वाचणाची प्रेरणा व आवड निर्माण व्हावी व त्यातून जीवनाचा उत्कर्ष व्हावा तसेच या पुस्तिका वाटप करून जयंती दिनी बाबासाहेबांच्या आवडीच्या कार्याला चालना देऊन बाबासाहेबांना अभिवादन करावे”, या उद्देशाने उपक्रम आयोजित केल्याचे भाग्यदेव घुले यांनी सांगितले.