पुणेः- डॉ बाबासाहेब आंबेडकर जनजागृती प्रतिष्ठान च्यावतीने आज बोपखेल भागांमध्ये चारा छावणी केंद्र सुरू करण्यात आले, covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.
कार्यक्रमाचे उद्घाटन भोसरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री कदम साहेब यांनी केले. त्यावेळी समिर झपके, बाबासाहेब घाडगे, महेश झपके, भाग्यदेव घुले, अनिल संमुद्रे, अनिल बेनाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष- शिवाजी उदगिरे, शिवाजी शिंदे, संदीप खांडेकर, अरुण मोरे, प्रविण धिवार, प्रतिष्ठानच्या इ लोकांनी हा उपक्रम चालू केला आहे व आभार संजय सुपे यांनी केले.