पिपीसी न्युज नेटवर्क!
कोथरूड:भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडचे मा. अध्यक्ष जगन्नाथजी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील गरजु रिक्षाचालक तसेच रंगकाम करणारे कारागीर यांना शिधावाटप करण्यात आले.
याप्रसंगी रा.स्व.संघ पुणे महानगराचे मा.धनंजयराव काळे,पोखरणच्या अणुचाचणीवेळी डॅा.अब्दुल कलाम यांचेबरोबर प्रत्यक्ष फिल्डवर कामगिरी बजावणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ DRDO चे Incharge मा.प्रदिपजी कुरुलकर, श्री.हिरामनजी जगताप, मतदारसंघाचे अध्यक्ष मा.पुनीत जोशी, नगरसेवक जयंतजी भावे,डॅा.सौ. कुरुलकर,श्री.राजाभाऊ भोंडवे, श्री.पांडुरंग दुबळे,सिनेट सदस्य विवेक बुचडे, श्री.सचिन मोकाटे, श्री.अमोल डांगे, श्री.सोमनाथ गुंड, श्री.सुधीर पाचपोर,सनी भोंडवे , श्री.शंकर वाघमारे , श्री.अविनाश देव,सौ.ज्योत्स्नाताई कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात रिक्षामध्ये ॲाक्सिजनचे सिलेंडर बसवून रूग्णांना हॅास्पिटलपर्यंत पोहोचविण्यासाठी रिक्षाचा ॲम्ब्युलन्ससारखा उपयोग करून मोफत रूगणसेवा करणार्या रिक्षाचालकांचा व महिला रिक्षाचालकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
*मा.चंद्रकांतदादांनी* रिक्षाचालकांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित केले तसेच सामाजिक बांधिलकीतून यापुढेही गरजुंना/वंचितांना शक्य तितकी मदत करण्याचे कार्यकर्त्यांनाही आवाहन केले.