अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्याकडून सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपल्या सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर,सनसिटी रोड परिसर, विठ्ठलवाडी परिसर, आपटे कॉलनी परिसर,हिंगणे गाव, अरविंद सोसायटी अशा विविध परिसरातील नागरिकांना गेले तीन चार दिवसांपासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधाच्या गोळ्यांच्या किटचे तसेच मल्टिपर्पज इन्फेक्शन हॅण्ड फ्री टूलचे वाटप करण्यात आले.यावेळी याचे फायदे पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त करून प्रसन्नदादांचे व मित्र परिवाराचे आभार मानले.याप्रसंगी किशोर कुलकर्णी, अनंत शहाकर, सुरेश देशमुख,सोमशेखर कमतगी,रवि चौधरी, अनिल तोडकर, ओंकार तोडकर,प्रशांत तोलगेकर, गणेश चौधरी,लखन कराड, गणेश सावंत आदी प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या सहाय्याने साधारणतः साडे तीन हजार गोळ्यांच्या किटचे तर तीन हजार हॅण्ड फ्री टूलचे आतापर्यंत वाटप करण्यात आले असून अजून पुढे दोन ते तीन दिवस हे वाटप सुरू राहिल.
याद्वारे अॅड प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने नागरिकांची काळजी व त्यांना कोरोना महामारीच्या या कठीण काळात धीर देण्यात येत आहे.तसेच जितकी जास्त मदत करता येईल तितकी मदत सुरू आहे.यातूनही जर हे किट कुणाला मिळाले नसेल तर प्रसन्नदादा जगताप यांना संपर्क साधावा.