पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. १४) रोजी ३३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात १८ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील पिंपरीतील नाणेकरचाळ येथील ४० वर्षीय महिलेचा व आकुर्डीतील अजंठानगरमधील ४७ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११८१ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४६९ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
बाधित झालेले रुग्ण बौध्दनगर, चिंचवड, गणेशनगर थेरगाव, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, भाटनगर, अजंठानगर आनंदनगर, सिद्धार्थनगर दापोडी, पाटीलनगर चिखली, केशवनगर चिंचवड, ऐश्वर्यम चिखली, तानाजीनगर चिंचवडगाव येथील रहिवाशी आहेत.
पिंपरीतील नाणेकर चाळ, सांगवीतील जयमालानगर, आंनदनगर, अजंठानगर, आकुर्डी, गुलाबनगर, जय भीमनगर दापोडी, साईबाबानगर,लिंकरोड पिंपरी, कासारवाडीतील गुरुनानक कॉलनी येथील ५६ कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ६७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.