न्यूज पोर्टल आणि डिजिटल आवृत्ती राष्ट्र समाचार चा वर्धापन दिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा
पिपीसी न्यूज नेटवर्क,
| प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड, दिनांक २१ : पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये निर्भिडपणे बातमी देणारे न्यूज पोर्टल आणि डिजिटल आवृत्ती “राष्ट्र समाचार” वर्षपूर्ती झाल्यामुळे दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात राष्ट्र समाचार न्यूज चा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. दरम्यान राष्ट्र समाचार चे संपादक माऊली उर्फ किसन भोसले यांचा वाढदिवस याच याच दिवशी असल्यामुळे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित मित्र परिवार, नातेवाईक, पत्रकार, संपादक, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी राष्ट्र समाचार प्रथम वर्धापन दिन व माऊली भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिलेंद्र मोरे (ज्येष्ठ पत्रकार), प्रमुख उपस्थिती मध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे, परिषदेचे सदस्य अनिल वडघुले, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे, नगरसेवक राहुल कलाटे इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

माऊली भोसले राष्ट्र समाचारचे संपादक पत्रकार म्हणून कार्य करीत आहेतच तसेच ते पिंपरी चिंचवड शहरातील हातगाडी पथारी पंचायत चे निवडून आलेले सदस्य आहेत. शहरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची असलेली ओळख आणि दांडगा जनसंपर्क पाहता कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशोधरा महिला बचत गट, सदगुरू महिला बचत गट, भाग्यश्री महिला बचत गट, रणरागिणी महिला बचत गट इत्यादी महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्र समाचार चे संपादक माऊली भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील माता भगिनींचा वृक्ष रोप देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये रमाई स्मारकाचे समन्वयक विठ्ठल दादा गायकवाड, जेष्ठ पत्रकार दादाराव आढाव, गगनगिरी भक्त सयाजी भांदिगरे महाराज, मल्हारी भाऊ काळे, राष्ट्रसमाचार न्यूजचे हिरुभाऊ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेशजी भोसले, मारुती बाणेवार, पराग डिंगणकर, रमेश साठे, अशोक कोकणे, पत्रकार नरेश सोंडकर, महावीर जाधव, संतोष गोतावळे, स्नेह छाया परिवाराचे प्राध्यापक दत्तात्रय इंगळे सर, सुरज साळवे, देवा भालके, पत्रकार श्याम भाऊ सोनवणे, सिद्धांत चौधरी, पत्रकार हनुमंत रामदासी, शंभू कांबळे, रमेश बवले, मॅनेजर रामा भोसले, अनिल काळे, मंजू ताई भोसले, वंचित बहुजन आघाडीचे संतोष कसबे, बी के भालेराव, दस्तगीर काळे, साळवे सर, महामुनी सर, कवी आकाश सोनवणे, प्रल्हाद कांबळे, भीमराव बरगडे, सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे इत्यादी मान्यवर यांच्यासह वाचक दर्शक आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्र समाचार चे संपादक माउली भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन विनय सोनवणे यांनी केले. सुरुवातीला दीपप्रज्वलन झाल्यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत स्वागता वेळी गायक सुनील म्हस्के यांनी भारदस्त आवाजात सादर केले.



















































