वारजे ;प्रतिनिधी अजय जाधव!
माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि हा चौथा स्तंभ ज्यांच्या खांद्यावर उभा आहे ते म्हणजे पत्रकार असेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्या खांद्यावर उचलणारे आपल्या वारजेतील पत्रकारांची आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा केली, त्यांचा सन्मान केला आणि त्यांना ज्या लेखणीने ते समाजातील प्रश्न मांडतात ती लेखणी म्हणजेच पेन भेट म्हणून दिले.
यावेळी सकाळचे वृत्तपत्राचे प्रतिनिधी महादेवजी पवार, चेकमेटचे संपादक धनराजजी माने, पुढारीचे प्रदीपजी बालढे, सागरजी जगताप तसेच लोकमतचे सचिनजी सिंग आदी मान्यवरांसोबत पत्रकार दिन साजरा करण्यात आला.





















































