पिपीसी न्यूज नेटवर्क ,
अजय जाधव
पिंपरी चिंचवड:अवैध शस्त्रांवर कारवाई करत गुन्हे शाखा युनिट-२ ने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून दोन आरोपींकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
दि. ०९ एप्रिल रोजी अवैध शस्त्र मोहिमेदरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी रवि पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुसगाव परिसरातून आदित्य लक्ष्मण शितोळे (वय २३) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गु.र. नं. १३६/२६ अन्वये आर्म ॲक्ट ३(२५)तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७(१)(३)सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी आदेश राम टेमकर (वय २४, रा. पारखे वस्ती, सुसगाव) यास २१ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत कसून चौकशीदरम्यान त्याच्याकडून आणखी एक पिस्टल जप्त करण्यात आली.
🔎 जप्त मुद्देमाल:
▪️ ०२पिस्टल (एकूण किंमत अंदाजे १ लाख रुपये)
▪️ ०२जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे २ हजार रुपये)
📍 घटनास्थळ: सनीज वर्ल्ड समोर, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे
आरोपी आदेश टेमकरचा गुन्हेगारी इतिहास:
आदेश टेमकर याच्यावर हिंजवडी, बावधन व सिंहगड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण १०गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईतील अधिकारी:
या कारवाईत PSI मयुरेश साळुंखे, ASI प्रवीण दळे, नितीन ढोरजे, HC तुषार शेटे, HC विक्रम कुदळ, PC प्रशांत सैद व PC रवि पवार यांनी सहभाग घेतला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची कठोर कारवाई सुरूच असून नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत तत्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















































