पुणेः- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देवस्थान समितीने करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ८ अशी वेळ होती दि. २५ /२ /२०२१ पासून सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे.
दुपारी १२ ते ३ यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद रहाणार आहे. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील दर्शन वेळेत बदल करण्यात आले असून शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच सोशल डिस्टंन्ससह सँनिटायजर हातावर घेऊन दर्शनाला सोडले जाईल तसेच मंदिर परिसरात फोटो काढतांना आढळलेस मोबाईल फोन जप्त केले जातील, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव यांनी दिली आहे. यावेळी जुना राजवाडा पोलीस निरीक्षक जाधवसो, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, पुजारी प्रतिनिधी माधव मुनिश्वर उपस्थित होते.