खराडी : स्वच्छता कर्मचारी खऱ्या अर्थाने आपल्या शहरांची परिसराची स्वच्छता राखून जणू काही लक्ष्मीला, वैभवाला, समृद्धीला वाट करून देतात. या महिला कर्मचाऱ्यांची पावलं म्हणजे लक्ष्मीचीच पावलं आहेत. असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. म्हणून ही पावलं जपली पाहिजेत” असे मत सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन तर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘महिला दिना’चे औचित्य साधून शूज भेट देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेविका संजीला पठारे, नगरसेविका सुमन पठारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, वार्ड ऑफिसर सुहास जगताप, आरोग्य अधिकारी शंकर जगताप, आरोग्य निरीक्षक समीर खुळे, सुषमा मुंढे, शुभांगी अभोणकर, तसेच सीमा तनवर, सर्वजित कोराड, स्वाती खटके आदी उपस्थित होते.
सुरेंद्र म्हणाले की, आम्हाला अपेक्षा आहे या छोटयाशा भेटीतून ही लक्ष्मीची पावलं सुरक्षित राहण्यात मदत होईल आणि यांसारख्या इतर अनेक उपक्रमांतून स्वच्छतादूत आणि यांसारख्या अनेक समाजातील इतर घटकांना मदत करत राहू.




















































