आई अगं,मी शाळेत जातोय डब्यात आज काय देणार गं? असा प्रश्न गेले १.५ वर्ष शाळेत जाणारी मुलं कमी विचारताना दिसतायत कारण एकच सगळं असंच आमचं आता आॅनलाईन झालयं गाणे, योगा, तबला क्लास सगळंच आँनलाईन अगदी आडला हरि गुगल सर्च करी झालयं !
नित्यानुसार मित्रांचे ग्रुप डबा खाताना महिला साड्या घेताना, माॅल तुळशीबागेत जाताना, महिलांची वर्दळ वगैरे अगदी नाहीसच झालयं पण हे जर पुन्हा नियमित सुरू करायची असेल तर सरकारवर ताशेरे वा कोरोना , कोविड १९ स्कॅम आहेत असं बेधुंदित काहीही बोलणं आणि बेछुट वागणार्या बधिर मदांध सुशिक्षित बालकांनो जागे व्हा आणि आता वायफळ बडबड करण्यापेक्षा सरकारला सहाय्य करा फक्त घरात बसून आपल्या अाप्तेष्टांना वाचवण्याचे, सिरमवर वैगरे मोर्चे काढण्यापेक्षा बुद्धीचा वापर करा आणि “जपा आणि जपा” कारण ही परिस्थिती तिसर्या महायुद्धाची सुरूवात असल्याच्या अनेक बातम्या दिसल्या त्याचाही विचार करा
एका डाॅक्टर इसमाशी संवाद साधताना तो म्हणाला कि नाईट शिफ्टचे आम्हाला १५०० रूपये कोविड ड्यूटीवर मिळतात आणि काल तीच नाईट होती डोळ्या देखत २ कोरोना रूग्ण दगावले २ मिनीटापुर्वी हसणारा पेशंट दगावतो तर आम्ही डाॅक्टर लोक पण माणसचं आहोत मन हेलावतं मनापासून हा प्रसंग ऐकताना पाणी सरसावतचं.पुण्यात,
महाराष्ट्रात ,देशात रोज अनेक लाखाच्या घरात पेशंट दगावत आहेत ते पण आता टोपीवाल्याच्या गोष्टी सारखे आतातरी टोपीवाल्याची गोष्ट ऐका आणि अमलात आणा रोजच्या जगण्याच्या! अजून हे वाढवलं ते वाढवलं म्हणण्याच्या पेक्षा उठा जागे व्हा आणि मर्द धमण्या खेळवा सळसळतं रक्त नीट जगा जगू द्या लोकांच्या संपर्कात आॅनलाईन रहा अजून फक्त काही दिवस पाळा जर आधी सारखं जगायचं असेल तर! ज्याचा घरचा माणूस गेला त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळालं त्यामुळे खरचचं विनंती आहे की मदत करा आणि करू द्या नीट रहा आणि राहू द्या
अनेक जगातील देश या महामारीत भारताला मदतीचा हात देत आहेत ,सकारात्मकतेनी याकडे बघा रे !रेमेडिसिव्हियर्स, आँक्सिजन बेड, म्युकरमायकोसिस, वॅक्सिनेशन सगळं सगळं बदलेल पण आपण ठरवलं तर आणि तरच,त्यामुळे सरकार, माध्यमे वा डाँक्टर आणि इतर सहकारी सगळ्याचे आभार आणि नमन कारण ते काम करतायत म्हणून सामान्य वाचतोय. लाॅकडाऊनचे नियम पाळा आणि वाचा तरच वाचाल आणि जगाल !
– तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादिका पीपीसी न्यूज नेटवर्क पुणे)