पुणे : नोकरीसाठी जात असताना एका व्यक्तीला एका वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. मदन शिंदे असे त्या व्यक्तीचे नाव असून ते अपघात गंभीर जखमी झाले असून शरीरात अंतर्गत भागात गंभीर इजा झाली आहे. परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीचा हात हवा आहे.
शिंदे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. पत्नी, दोन मुले असा शिंदेंचा परिवार आहे. घरात ते एकटेच कमावते आहेत. मित्र परिवार, पाहुणे यांच्या मदतीने अद्याप पर्यत ४ ते ५ लाख रुपये त्यांच्या उपचारासाठी खर्च झाले आहेत. पुढील उपचारासाठी आणखी ५ ते ७ लाखांपेक्षा अधिक खर्च लागू शकतो असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. काही सामाजिक संघटनांनी पुढे येत मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र निधी कमी अपुरा पडत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे.
मदन सुरेश शिंदे खाते क्रमांक:- 056601518290 , आय एफसी कोड ICIC0000556 असा असून 9970703337 या मोबाईल क्रमांकावर खात्री करता येईल.