पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात नोकरी करणाऱ्या तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अर्धवेळ अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेच्या अधिष्ठाता नूतन जाधव, शांतीलाल हजेरी आदी उपस्थित होते.
चोरडिया म्हणाले की, विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदरवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पदवीचे शिक्षण झाले की अनेक तरुण नोकरी करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा तरुणांना पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची संधी सूर्यदत्ततर्फे दिली जात आहे. केवळ आर्थिक अडचण असल्याने शिक्षण थांबू नये, हा यामागील उद्देश आहे. नोकरदार, छोटे व्यावसायिक यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत.
संस्थेच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ अशी आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी ०२०-२४३२५८३० किंवा ८९५६९३२४१५ यावर प्रा. नूतन जाधव यांचेशी संपर्क साधावा, असे चोरडिया यांनी नमूद केले.