पुणेः- शहरातील जंगली महाराज रस्त्यावर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घडले असे की, सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील आरोपी आदित्य चंदेल व दत्ता इंगळे यांच्याकडे पिस्तूल सारखे हत्यार असून ते संचेती हॉस्पिटल ते जंगली महाराज रोड या भागात गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती सचिन जाधव यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रोडवर युनिटे1 कडील अधिकारी-कर्मचारी यांनी फिरून सापळा रचून संचिती हॉस्पिटल बस स्टॉप जंगली महाराज रोड पुणे येथे आरोपी आदित्य रणजीत चंदेल वय 21 राहणार सन 33/1 जुनी ग्रामपंचायत जवळ आंबेगाव खुर्द पुणे व दत्ता उर्फ राजेश भास्कर इंगळे वय 22 यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता प्रत्येकाकडे एक पिस्तूल व दोन काडतुसे असे एकूण २ पिस्तूल 4 काडतुस असे एकूण रू 1,24,000 चा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 20/21 हत्यार, कलम3(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) RW135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरी मध्ये व पो. नि. सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस फौजदार सतीश भालेकर, विजयसिंह अशोक माने, अजय थोरात, योगेश जगताप, पोलीस अमलदार सचिन जाधव, इमरान शेख, अय्याज दड्डीकर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड, अमोल पवार यांनी भाग घेतला होता.