प्रतिनिधीः- अजय जाधव
पुणेः- युनिट-१, गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सचिन जाधव, प्रशांत गायकवाड व दत्ता सोनवणे यांना माहिती मिळाली की, योगेश बोरगे व ऋषीकेश गरुड यांच्याकडे पिस्तूल सारखे हत्यार असून ते कोणावरतरी प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने ते हकारनगर येथील तळजाई टेकडी मेनगेट रोडवर जागा बदलून फिरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरिक्षक सुनिल कुलकर्णी व वरील नमुद असलेल्या स्टाफने पाहणी केली तेव्हा शिवाजी मराठा सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चसमोर सार्वजनिक रोडच्या पलिकडे योगेश बोरगे व ऋषीकेश गरुड हे थांबलेले दिसले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी योगेश गणेश बोरगे वय २३ रा. यशवंत चव्हाणनगर दत्त मंदीरासमोर धनकवडी पुणे, व ऋषीकेश राजाभाऊ गरुड वय २२. रा पद्मावती वसाहत ६५/२ सहकारनगर पद्मावती मंदिराजवळ अशी सांगितली.
पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली तेव्हा योगेश बोरगे याच्या शर्टच्या आत १ पिस्तूल व १ काडतुसे आढळली. त्याचबरोबर ऋषीकेश गरुड याच्याकडे देखील १ पिस्तूल व १ काडतुसे आढळली. असा एकूण रुपये १,२२,००० चा माल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस अंमलदार शशीकांत दरेकर यांनी नमुद गुन्हेगाराविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ५९/२०२१ हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी गुन्हे शाखा पुणे सहरचे पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल ताकवले, पोलीस उप-निरिक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सचिन जाधव, सतीश भालेकर, विजेसिंग वसावे, अशोक माने, प्रशांत गायंवाड, दत्ता सोनवणे, इम्रान शेख, शशीकांत दरेकर, महेश बामगुडे यांनी केली आहे.