पुणेः- फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रं. ०१ चिखली येथे काल महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली या ठिकाणी चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी एकूण ०५ अनधिकृत बांधकामावरील एकूण २९४८.२४ चौ.फुट ( २७४.०० चौ.मी. ) क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई अतिरीक्त आयुक्त अजित पवार, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली व उपअभियंता सुधिर मोरे तसेच विश्वनाथ राऊत व रविंद्र भोकरे कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक ०५ तसेच महापालिका अतिक्रमण पथक, जे.सी.बी. – २ व मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करण्यात आली.





















































