पुणे: पुणे शहरात ‘क्रांती मजूर सेना’ या सामाजिक संघटनेच्या बांधणीसाठी पुणे शहरात चारही दिशेची बैठक असंघटित कामगार यांना एकत्र करून मूठ बांधण्याचे काम करत असताना पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार हे मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यांनी त्यांची सविस्तर माहिती देऊन त्यांना किमान वेतनात होत असलेली लूट व इ. एस. आय, इ.पी.एफ कामगार कल्याण निधी व सुरक्षा साधने यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली लूट समोर आली आहे.
पुणे महापालिकेत ६,५०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार आहेत. त्यांना आत्तापर्यंत लुटण्याचे काम हे कामगार कल्याण विभाग यांच्या मुळे झाले आहे. हे आम्ही संशोधन व शोधून या विभागाने ‘ना हरकत दाखला’ दिल्याशिवाय ठेकेदारांचे बिल मिळत नाही मग हे प्रभारी उपकामगार काय तपासणी करतात आणि महापालिकेतील सत्ताधारी विरोधी पक्ष नेत्यांसह सर्व गटनेते काय करतात हाच मोठा प्रश्न उपस्थित होत असल्याने यात नक्की कोणा-कोणाचे हात काळे- पांढरे झाले आहेत हे शोधून बहुजन समाजातील कंत्राटी कामगारांना त्यांचा हक्क मिळावा महापौर, विरोधी पक्षनेते यांसह सर्व गटनेत्यांना प्रत्येकाच्या प्रभागात आंदोलन करणार असे क्रांती मजूर सेना यांच्याकडून कळविण्यात येत आहे.