पुणे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांचा सामाजिक उपक्रम
पुणे : पुणे शहरात कोरोणा रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यातच वडगांवशेरी मधील प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक रूग्ण संख्या आहे.
त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगांवशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते नारायण गलांडे यांनी स्वखर्चाने प्रभागात औषध फवारणी चालु केली आहे. यामध्ये पुर्ण प्रभागातील मोठ-मोठ्या सोसायट्या,सर्व सामान्य नागरिक वसाहत, रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळे त्याच बरोबर संपुर्ण प्रभागात औषध फवारणी चालु आहे.
नारायण गलांडे म्हणाले हा प्रभाग म्हणजे माझे कुटुंब आहे आणि कुटुंबाची काळजी घेणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. तसेच पुढील काळातही नागरिकांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर असेल.
नागरिकांनी विनामास्क फिरू नये,रस्त्यावर विनाकारण गर्दी करू नये, वेळोवेळी सॅनिटायझर चा वापर करा,कोरोणा सदृश्य काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन गलांडे यांनी केले आहे.