पुणे : तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती स्व.गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठाणच्या वतीने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रतिष्ठाण चे मार्गदर्शक व शिवसेना शहर संघटक राजाभाऊ चौधरी यांच्या हस्ते पूजा व पुष्पहार घालून करण्यात आली.
खराडी, चंदननगर, वडगांव शेरी, साईनाथ नगर, येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्यांचा कोरोनायोद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.
राजाभाऊ चौधरी म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजा मध्ये महिलेला माते समान,भगिनी समान व मुली समान वागणूक देण्याचा जनतेला संदेश दिला. ते विचार आज समाजाने आचरणात आणले तर कोणत्याही महिलेवर अत्याचार अन्याय होणार नाही. प्रतिष्ठाण च्या सचिव प्रियांका दरगुडे-चौधरी यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोरोना च्या काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान व ऑक्सिजन लेवल तपासण्याचे काम केले. त्याबद्दल प्रतिष्ठाण च्या वतीने त्यांना साडी, मिठाई व गुलाब पुष्प देऊन कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले असे सांगितले. तसेच प्रतिष्ठाण चे अध्यक्ष दौलत चौधरी यांनी राबविलेल्या आयुष्यमान भारत योजना, शहरी गरीब योजना, आधार कार्ड, मतदान कार्ड, व पॅनकार्ड यांचे मोफत स्मार्टकार्ड याबाबत माहीती दिली. हा उपक्रम यापुढेही चालू राहणार आहे. या वेळी ऑड नानासाहेब कुमकर , सुनील चौधरी, शशिकांत चौधरी, सचिन लोखंडे, पप्पू गिरी, उमेश ताकवले, अमोल राव, शहानुर शेख,व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सचिव प्रियांका दरगुडे-चौधरी व अध्यक्ष दौलत चौधरी व मित्र परिवार यांनी केले.