पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनाने टाळेबंदी चालू केली आहे. यावर सध्यातरी लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. महापालिकेने लसीकरण केंद्र सुरु केले आहे. अनेक ठिकाणी महापालिकेने पुरविलेल्या लस व लसीकरण केंद्रावर दिवसभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लस यामध्ये मोठ्याप्रमाणात तफावत आहे त्यामुळे या सर्व केंद्रांवर दोन्ही लसींचा पुरवठा समान व योग्यप्रमाणात करण्यात यावा, लसीकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक समिती स्थापन करून नियंत्रण ठेवावे.
कोथरूड व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या अनेक लसीकरण केंद्राच्या बाहेर किंवा आसपास राजकीय पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी करून लसीकरण केंद्र स्वतःच्या ताब्यात असल्यासारखे चित्र निर्माण केले आहे. लसीकरण केंद्रावर गर्दीचे नियंत्रण करण्यात राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते व माननीय मदतीपेक्षा अडथळाच निर्माण करत आहेत. ऑनलाईन नोंदणी प्रकिया असून सुद्धा लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते आपल्या मर्जीतल्या नागरिकांना रांगे मध्ये न लावता व ऑनलाईन नोंदणी न करता थेट लस देण्यासाठी घेऊन जात असल्याने पहाटेपासून जे नागरिक रांगेत आहेत त्यांच्यामध्ये व कार्यकर्त्यांमध्ये भांडणाचे खटकेही अनेकदा उडत आहेत अश्याप्रकारच्या तक्रार अनेक लसीकरण केंद्रातील अधिकारी व नागरिक आमच्या कार्यालयात देत आहे. आपल्या मर्जीतल्यांना लसीकरण करण्यावरून वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्येहि मोठा वाद होण्याची दाट शक्यता आहे या वादातून टाळाबंदीच्या काळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येईल.
या दोन्ही मतदार संघात पालिकेच्या मालकीच्या जाहिरातीसाठीच्या अश्या अनेक जागा व डिजिटल बोर्ड आहेत कि जिथे लसीकरणाची जाहिरात व माहिती नागरिकांना मोफत मिळू शकेल त्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी करून लसीकरण केंद्र बळकवण्याची काहीही गरज नाही. तरी आपणास विनंती कि असे अनधिकृतपणे फ्लेक्स बॅनर्स लवकरात लवकर काढावे व गर्दी नियंत्रित करून रांगा लावण्यासाठी पालिकेचे शिपाई नेमण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी. अशाप्रकारचे निवेदन मा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना आज शुक्रवार दि १४ मे २०२१ रोजी निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष सुहास निम्हण, संगमवाडी शाखा अध्यक्ष मुकेश खांडरे व किशोर इंगवले उपस्थित होते.
लसीकरण केंद्र सक्षमीकरण करणेबाबत व अनधिकृत फ्लेक्स काढण्याबाबत निर्णय झाला.
Share this: