कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रात सरकारद्वारे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे भिमाई प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून समाजातील दुर्लक्षित तृतीयपंथी यांना रेशन कीट देण्यात आले सदरील कीट अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, समाजसेविका लक्ष्मीनारायण त्रिपाठी, उद्योजक मनिष जैन, पूजा जैन मॅडम तसेच आमचे मार्गदर्शक पोलीस प्रशासनातील विजय आंब्रे सर, यांच्याकडून मिळाले. सदर किट चे वाटप मा. राहुल पवार सर(PSI) ताडीवाला रोड, पोलीस चौकी, पुणे, प्रकाश सावंत (महाराष्ट्र पोलीस) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भिमाई प्रतिष्ठानचे सुनील रजपूत (संस्थापक), अजय गायकवाड (अध्यक्ष), गुलाब माविनकर विरेष पवार, प्रफुल कांबळे, कुमार कांबळे, आकाश गायकवाड, प्रशांत आसवले, नितीन लोखंडे, राजू आढाव, धीरज जोशी हे उपस्थित होते.
भिमाई प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून अनेक संस्थां व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आतापर्यंत 2000 किटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कोणत्या संस्थांना मदत करायची असेल तर भिमाई प्रतिष्ठान ताडीवाला रोड ,9623988054 8888781985 यांना संपर्क करावा.
– अजय जाधव (पीपीसी न्यूज नेटवर्क)