कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड परिसरात गेले आठ ते दहा दिवसांपासून नगरसेवक प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवारातर्फे विविध ठिकाणी सॅनिटायझर मशीन व सॅनिटायझर देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आजपर्यंत अनेक सोसायट्यामध्ये, वर्दळीच्या मोठमोठ्या दुकानांत, हॉस्पिटल्स, बँक, स्वीटहोम्स, यांच्या दाराजवळ सॅनिटायझर मशीन लावली आहेत. तसेच या पहिल्या टप्प्यामधे अनेक नागरिक नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या घरून व ऑफिसमधून स्वत:हून हे सॅनिटायझर मशीन नेऊन आपापल्या दुकानासमोर सोसायटीच्या दाराजवळ लावून त्याचे फोटो पाठवून आभार व्यक्त करत आहेत. या कोरोना महामारीच्या संकटात आपल्याकडून समाजासाठी जे काही करता येईल तितका खारीचा वाटा उचलत आहोत. याचा अधिकाअधिक बंधुभगिनी, नागरिकांना लाभ घेता यावा यासाठीचे प्रयत्न नगरसेवक प्रसन्नदादा जगताप करत आहेत. नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांनी सांगितले की, `जेवढे मला जमेल व झेपेल तेवढे काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. सिंहगडरोड नागरिकांनी आतापर्यंत मला जे सहकार्य केले आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील माझे काम असेच अविरत चालू राहील.’