पुणे :
विविध क्षेत्रात संशोधन करु इच्छीणाऱ्या,पी.एच.डी. करु इच्छिणाऱ्या आणि परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीने आज स्कॉलरशिपची घोषणा केली.शिष्यवृत्तीची एकूण रक्कम साडेचार कोटी पर्यंत आहे.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाईन भरता येईल. भारतातील कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थी त्यांची ट्यूशन फी, राहण्याचा खर्चात सवलत मिळवू शकतात. अधिक माहिती www.cvu.education या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थी आपली माहिती info@cvu.education या ईमेलवर पाठवू शकतात.





















































