पि पी सी न्यूज; नेटवर्क प्रतिनिधी; अजय जाधव!
पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून अमरावती येथे सासूचा खून करून पळून आलेला दिनेश भानुदास बोरखडे( वय ३१रा. अमरावती) याला विमानतळ पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले.
विमानतळ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अविनाश शेवाळे व नाना कर्चे यांना खबऱ्या मार्फत मिळाली येरवडा येथे दिनेश हा एका ट्रॅव्हलच्या बसने येणार आहे. ऊसदर आरोपी सासूचा खून करून पळून आलेला आहे. सदरची बातमी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना कळविल्यानंतर त्यांनी शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे बातमीचे ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने आरोपीकडे विचारपूस केली असता माझ्या पत्नीला सासरी पाठवत नसल्याने सासू रुकमा विनायक इंगळे यांच्या डोक्यात कुर॒हाड मारून तिचा खून केला आहे अशी माहिती मिळाली. सदर गुन्हाची नोंद आसेगाव पोलीस स्टेशन नोंदविण्यात आला असल्याचे समजले. त्याला पुढील कारवाई साठी अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
सदरची कारवाई नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त परी-०४ पुणे शहर, किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर यांच्या आदेशाने भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर मंगेश जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस फौजदार अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे, पोहावा रमेश लोहकरे, उमेश धेंडे, पोना सचिन जाधव, अंकुश जोगदंडे, रुपेश पिसाळ, प्रमोद महाजन, पोशी नाना कर्चे यांच्या पथकाने केली.