पि पी सी न्यूज नेटवर्क ;प्रतिनिधी अजय जाधव!
विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत हायात हॉटेल जवळ नगर रोड विमान नगर येथे सोमनाथ भीमराव वाघमारे हा आरोपी थांबला आहे अशी माहिती पोलीस नाईक महाजन यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली. सदर आरोपी हा बऱ्याच गुन्ह्यात विमानतळ पोलीस स्टेशनला हवा होता. पोलीस नाईक महाजन यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना कळवली. त्यानुसार त्यांनी शहानिशा करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकातील स्टाफ हयात हॉटेल येथे आरोपीस पकडण्यासाठी गेला असता आरोपीने तेथून पळ काढला असता त्यास पाठलाग करून बऱ्याच शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्याचे नाव सोमनाथ भीमराव वाघमारे वय ३९वर्ष रा. स.न१०३, गांधीनगर येरवडा, पुणे येथे राहत असून सध्या मार्केट कमिटी मागे सांगोला जिल्हा सोलापूर येथे रहात आहे. सदर आरोपी विरुद्ध विमान नगर पोलीस स्टेशन मध्ये विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच पुणे शहरामध्ये इतर पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत तपास चालू आहे.
सदरची कारवाई ही नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रोहिदास पवार पोलीस उपायुक्त परी-०४ पुणे शहर, किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर,यांच्या आदेशनुसार भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर,मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस फौजदार अविनाश शेवाळे, पोहवा रमेश लोहकरे,पोहावा उमेश धेडे,पोना रुपेश पिसाळ, विनोद महाजन, पोना हारून पठाण,पोना किरण अबदागिरे यांच्या पथकाने केली आहे.