पुणे, दि. 7 : जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकाकरिता 14 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता शरदचंद्र पवार सभागृह, पहिला मजला, नविन जिल्हा परिषद येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अदालतीत महालेखापाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक निवृत्तीवेतनधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.





















































