स्वप्ननगरी कॉलनी, इंडिअन कॉलनी, महाराष्ट्र कॉलनीचा समावेश
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाअंतर्गत ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या राष्ट्रीय हरिद लवाद (NGT) यांच्या सूचनेनुसार दि. 12/2/2021 रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 22 काळेवाडी येथील पवना नदीपात्रालगत असणाऱ्या स्वप्ननगरी कॉलनी, इंडिअन कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी परिसरातील व्यापारी व रहिवासी वापर असलेली 36 पत्राशेड व वीटबांधकाम असणाऱ्या अंदाजे 40619.00 चौ. फु. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई 3 जेसीबी, 1 डम्पर, 15 मजूर, 2 ट्रक्टर ब्रेकर आणि पि. चि. पोलीस आयुक्तालय वाकड पोलीस स्टेशनचे 25 पोलीस कर्मचारी, अधिकारी व मनपाचे 25 पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याने केली आहे. सदर कारवाई ‘ब’ प्रभाग अंतर्गत मा. अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, मा सहशहर अभियंता, मा क्षेत्रीय अधिकारी ब प्रभाग, कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली व 2 उपअभियंता, 3 कनिष्ठ अभियंता यांच्यासह 15 बीट ऑफीसर, 15 मनपा कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.