बाणेर प्रतिनिधी :(ppcnews.in):
पुणे शहरातील वाढती ट्राफिक मुंबई बेंगलोर हायवे परिसरातील बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे ट्राफिकची समस्या कायम पाहायला मिळत आहे आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर होते
पुण्यातील जेडब्लू मॅरीएट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राहुल बालवडकर, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली.
बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे परिसरातील होणारा ट्राफिकचा त्रास यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर घातले असता त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पुढील काळात बैठकीचे आयोजन करून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले.
दिलेल्या निवेदनातील संपूर्ण तपशील
बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे परिसरासह पुण्यातील नागरिकांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाचे निवेदन सादर केले. पुणे-बंगळोर राष्ट्रीय महामार्ग (NH48) हा केवळ पुणे शहराचाच नाही, तर महाराष्ट्राच्या वाहतुकीसाठी कणा आहे. मात्र या मार्गावर दररोज होणारी वाहतूक कोंडी ही प्रचंड गंभीर समस्या बनली आहे. बाणेरमधील राधा चौक, म्हाळुंगे आणि सुस गावातील मुख्य चौक याठिकाणी होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे हजारो वाहनचालकांना दररोज वेदनादायी अनुभव घ्यावा लागतो.
विशेषतः हिंजवडी आयटी पार्ककडून येणाऱ्या वाहनांना आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुणेकरांना या समस्येचा मोठा त्रास होत आहे.
या पार्श्वभूमीवर मी मा. गडकरी साहेबांना सविस्तर निवेदन दिले. निवेदनामध्ये चार ठोस उपाय सुचवले आहेत
१️. मर्सिडीज बेंझ शोरूमजवळ भुयारी मार्ग (Underpass) – मान व हिंजवडी कडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी हा underpass बांधला गेला तर वाहतुकीचा ताण कमी होईल.
२️. बिटवाईज कंपनीजवळ उड्डाणपूल – बाणेर पॅनकार्ड रोडवरून सूसच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना थेट महामार्ग ओलांडून सुसला जाण्यासाठी हा पूल आवश्यक आहे.
३️. सुमनकीर्ती मारुती सुझुकी शोरूमजवळ उड्डाणपूल – म्हाळुंगे गावातून येणारी वाहने थेट बालेवाडी मार्गे पुण्यात प्रवेश करू शकतील.
४️. सर्व्हिस रोडचा विकास (वाकड ते सुसखिंडपर्यंत) – दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते योग्य रीतीने विकसित झाले तर मुख्य महामार्गावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
या सर्व उपाययोजनांमुळे वाकडपासून सुसखिंडीपर्यंत वाहतुकीच्या समस्या आगामी अनेक दशकांसाठी संपुष्टात येतील. बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे भागातील नागरिकांचा दीर्घकालीन त्रास संपेल आणि पुणे-मुंबई-बंगळोर या महामार्गावरील प्रवास सुलभ होईल.
केंद्रीय मंत्री मा. गडकरी साहेबांनी माझे निवेदन लक्षपूर्वक ऐकले. त्यांनी त्वरित नॅशनल हायवे ॲथोरेटी ॲाफ इंडियाचे सिनिअर प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. संजय कदम साहेब यांना सदर प्रस्तावातील सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री अजित दादा पवार यांनी मा. नितीन गडकरी साहेबांसोबतच्या झालेल्या भेटीत मांडलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रस्तावाला मान्यता देत देहूपासून ते कात्रजपर्यंत एक स्वतंत्र कॉरिडॉर उभारण्याचे मोठे आश्वासन दिले आहे. हा कॉरिडॉर पुण्यातील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.
या भेटीतून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि ठोस आश्वासने ही केवळ बाणेर परिसरासाठीच नाहीत, तर संपूर्ण पुणे आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. यामुळे बाणेर, बालेवाडी, सूस व म्हाळुंगेसह संपूर्ण पुणे परिसरातील वाहतूक कोंडी थेट शून्यावर येणार आहे आणि नागरिकांना रोजच्या कोंडीतून मोकळा श्वास घेता येणार आहे. पुणेकरांच्या या प्राधान्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने दाखवलेली संवेदनशीलता निश्चितच प्रशंसनीय आहे. या उपक्रमामुळे आपल्या शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल याची मला खात्री आहे.