पुणे: प्रतिनिधी; (ppcnews.in)
महाराष्ट्र शासना च्या युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड. संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे (रा.खराडी,पुणे)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली सर्वागीण विकासासाठी कार्यरत राहणार आहे.संग्रामसिंह शेवाळे यांनी लंडन येथून कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते भारतात परतले आणि शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी अनेक राज्यव्यापी उपक्रम राबवले. विद्यार्थी, युवक व इतर समाजघटकांच्या प्रश्नांवर ते सतत कार्यरत असतात.
राज्य सरकारने राज्य युवा धोरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
‘या समितीच्या माध्यमातून युवकांसाठी शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक नेतृत्व आणि आत्मनिर्भरतेसाठी नवे व प्रभावी मार्ग शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांना बळ देणारे, त्यांना संधी उपलब्ध करून देणारे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे धोरण निर्माण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.’ असे मत ॲड. संग्रामसिंह शेवाळे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.