पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मार्च २०२६) : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी तीन उमेदवारांची शिफारस केली आहे. संबंधित अर्ज गटनेत्यांकडे सादर करण्यात आले असून, आगामी सर्वसाधारण सभेत या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
शहरातील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार तसेच युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक फझल शेख, राजेंद्र जगताप आणि सीमा सावळे यांची नावे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठविली आहेत.
सुचवण्यात आलेल्या तिन्ही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव आहे. फझल शेख यांनी यापूर्वी शिक्षण सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली असून अल्पसंख्याक समाजातील सक्रिय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. राजेंद्र जगताप यांची शहरातील राजकारणात ठोस पकड मानली जाते. तर सीमा सावळे या त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि प्रशासकीय कामांवरील अभ्यासू दृष्टीकोनामुळे चर्चेत राहिल्या आहेत.



















































