पिपीसी न्यूज नेटवर्क,
पिंपरी-चिंचवड : निगडी-रावेत येथील BRT बस स्थानक परिसरात गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. भक्ती शक्ती उद्यान पाठीमागील बस स्थानकाजवळ रस्त्यावर लोखंडी पोल खाली पडलेल्या अवस्थेत असून, दुसऱ्या ठिकाणी पोल लोंबकळत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः बसमध्ये चढ-उतार करण्याच्या ठिकाणीच लोखंडी पोल धोकादायक स्थितीत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात पीएमपीएमएल (PMPML) बस ट्रान्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ईमेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, या गंभीर प्रकाराची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनाही देण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सचिन काळभोर (भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी-चिंचवड) यांनी ही तक्रार नोंदवली असून,
“प्रवाशांच्या जीवाशी खेळ होण्याआधी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांची मागणी:
धोकादायक पोल त्वरित हटवून सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



















































