पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी
नवी सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा विश्वातील सर्वात मानाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या आमदार लक्ष्मणभाऊ जगताप चषक २०२६ चा सांगता समारंभ नुकताच पार पडला. ९ लाख रुपये रोख आणि ३ रॉयल एनफिल्ड बुलेट अशा बक्षिसांचे विजेते मानकरी ठरले.
प्रसिद्ध क्रिकेटपटू श्री. केदार जाधव, चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप आणि स्पर्धेचे आधारस्तंभ गोसेवक श्री. विजयशेठ जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने प्रेक्षकांची मने जिंकणारा टीम डीपीएस चा दिग्विजय घंटे हा या वर्षाच्या भव्य ट्रॉफी आणि रॉयल एनफिल्ड बुलेट गाडीचा महामानकरी ठरला. भव्य आयोजन आणि खेळाडूंच्या शिस्तबद्ध खेळामुळे हा क्रीडा महोत्सव गेल्या ११ वर्षापासून असाच सुरू आहे.
या स्पर्धेमध्ये सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव प्रीमियर लीग गट : या गटात शुभम दादा स्पोर्ट्स फाउंडेशन (नवी सांगवी) संघाने प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. एस.एस. जनरेटर्स (पिंपळे गुरव) द्वितीय, तर सहजयोग ग्रुप ११ (पिंपळे गुरव) तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. एम.एन.सी. पिंपळे गुरव आणि शिवाय वॉरियर्स यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. वैयक्तिक कामगिरीमध्ये हार्मिक चव्हाण उत्कृष्ट गोलंदाज, तर ओमकार काशीद उत्कृष्ट फलंदाज ठरला. शैलेंद्र उर्फ सनी कसबे याला मालिकावीर म्हणून बुलेट गाडी देऊन गौरविण्यात आले.

पुणे टेनिस क्रिकेट नियामक मंडळ व एक आमदार एक संघ गट : शिरूरच्या यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनने या गटात विजेतेपद मिळवले. मोहोळच्या ज्ञानेश्वरी इलेव्हनने द्वितीय, तर हडपसरच्या मातोश्री ११ ने तृतीय क्रमांक मिळवला. धानोरी संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. या गटात आसिफ शेख उत्कृष्ट गोलंदाज आणि पप्पू तोडकर उत्कृष्ट फलंदाज ठरले. मोहोळच्या प्रथमेश राठोडला मालिकावीर ही पदवी आणि बुलेट गाडी देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गट : कासारवाडीच्या संडे ११ संघाने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. नॉक आऊट ११ (रुपीनगर) संघाने द्वितीय, समीर रबरने तृतीय आणि गेम स्विंगरने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
“केवळ क्रिकेटचा खेळच नव्हे, तर शिस्त, संघभावना आणि जिद्दीचे दर्शन या स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडकरांना घडले. सर्व विजयी संघ आणि खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वर्षी पुन्हा एकदा अशाच उत्साहात भेटण्याच्या निर्धारासह, या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली आहे.”

















































