पिपीसी न्यूज नेटवर्क,
पुणे प्रतिनिधी :
पुणे महानगरपालिकेच्या 2022 मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टी यांच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले होते
आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणे महानगरपालिकेतील काही विभागांत नोकरी देण्याच्या नावाखाली बोगस भरती आणि आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. राजेंद्र बबनराव खेडेकर, नमिता बनसोडे, शिवानंद बाळासाहेब पाटील यांच्या टोळीने संगनमताने उमेदवारांकडून प्रत्येकी 45 लाख रुपये उकळले असून, त्यांना बनावट नियुक्ती आदेश आणि प्रशिक्षण आदेश दिले आहेत.या सर्व गैरव्यवहारात प्रशासकीय नावाचा गैरवापर या फसवणुकीत पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि सह्यांचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत.बेरोजगार तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक झाली असून, प्रशासनावरील लोकांचा विश्वास डळमळीत होत आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग तपासावा ? या घोटाळ्यात महापालिकेतील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी आम्ही करत आहोत.
या प्रकरणी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे गंभीर प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून देऊन या प्रकरणात आपण लक्ष घालून SIT मार्फत चौकशी करण्याची विनंती करणार आहे.
“हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक होणे गरजेचे आहे.”*
*— रविराज बबन काळे (प्रदेशाध्यक्ष ,युवा आघाडी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्य)



















































