पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पुणे, दि. २८ एप्रिल २०२६ : संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण कसे करावे, आत्मविश्वास वाढवणे आणि धैर्य विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून बी. के. पवार, लहू पारवे आणि सुभाष फासगे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षक म्हणून माधवी तौर, मिलिंद भिसे, शिवानी कांबळे, वैष्णवी मिथापेली, मृण्मयी किर्वे, हर्षवर्धन मोरे आणि सार्थक जगताप यांनी विद्यार्थ्यांना विविध स्वसंरक्षण तंत्रांची माहिती दिली.
प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना हातांच्या हालचाली, संतुलन राखणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्याचे प्रभावी उपाय शिकवले. विद्यार्थ्यांनी या सत्रात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि नवीन कौशल्ये आत्मसात केली.
या उपक्रमाला शाळेचे सचिव सोमनाथ वाघमारे, प्राचार्य सचिन कोल्हे आणि समन्वयक आरती भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षिका सीमा नारनवरे आणि सर्व शिक्षकवर्गाचा विशेष सहभाग होता.
शाळेच्या वतीने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले असून, अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले



















































