पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाची कोरोना संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामध्ये आज आणखीन सात पोलिसांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या २४ झाली आहे. आज पॉझिटिव्ह झालेल्यांमध्ये तीन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व पोलिसांची चाचणी करण्यात आली यामध्ये सहा पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणखी एक पोलीस ठाण्यातील पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशा प्रकारे एकूण सात पोलिसांचा अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला आहे.परी चिंचवड पोलिस आयुक्तालयाची कोरोना संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामध्ये आज आणखीन सात पोलिसांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या २४ झाली आहे. आज पॉझिटिव्ह झालेल्यांमध्ये तीन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व पोलिसांची चाचणी करण्यात आली यामध्ये सहा पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणखी एक पोलीस ठाण्यातील पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशा प्रकारे एकूण सात पोलिसांचा अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला आहे.





















































