पुरंदर; प्रतिनिधी; अजय जाधव!
महाराष्ट्रात धुम्रपान उत्पादन करणाऱ्या संभाजी बिडी उद्योग समुहा विरोधात संभाजी हे नाव बंद करून व्यवसाय करावा यासंदर्भात पुरंदर येथे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे व पदाधिकारी हे अमरण उपोषण करत आहेत. कॅरोना व्हायरस मुळे सोशल डिस्टन्स चे तंतोतंत पालन करून मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात येत आहे
महाराष्ट्रात धूम्रपान करणारे बिडीस संभाजी महाराज यांचे नाव दिले गेले असून हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान आहे त्यामुळे ताबडतोब महाराजांचे नाव या बिडिस देणे बंद करावे अशी मागणी करत शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक आण्णा घाटे यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर येथे अमरण उपोषण सुरू करण्यात आले. सदर उपोषणात करता संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा जाहीर होत आहे. अखिल भारतीय होलार समाज संघटना, शिवसेना भोर पुणे जिल्हा, सारथी वाहतूक आघाडी, या संघटनांनी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच माननीय खासदार उदयन महाराज यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी सिताराम काटे, पत्रकार अजय जाधव, दत्तात्रय जगताप, सोमनाथ चव्हाण, सर्जेराव कांबळे, रुपेश कांबळे, मंथन पवार ,समीर मुलानी, रोहन कांबळे, साजन ढा वरे, अक्षय चव्हाण, नारायण चव्हाण, प्रणव गवळी, संजय खंडागळे, भैय्यासाहेब शिंदे, नारायण कांबळे, उमाजी जाधव, गणेश बुधावले, ओंकार साळुंखे, तेजस सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपोषणास उपस्थित होते
.
![शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांचे संभाजी बिडी विरोधात अमरण उपोषण](https://ppcnews.in/wp-content/uploads/2020/09/IMG-20200906-WA0060.jpg)
शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांचे संभाजी बिडी विरोधात अमरण उपोषण
Share this: