पुरंदर; प्रतिनिधी अजित जाधव!
महाराष्ट्रात धुम्रपान उत्पादन करणाऱ्या संभाजी बिडी उद्योग समूह विरोधात संभाजी हे नाव बंद करून व्यवसाय करावा यासंदर्भात पुरंदर येथे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे व पदाधिकारी हे अमरण उपोषण करता बसले आहेत. करोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सचे पालन करून मोजक्याच पदाधिकार्यांची उपस्थिती हे आंदोलन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात धूम्रपान करणाऱ्या बिडीस छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले गेले असून हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान असून तत्काळ महाराजांचे नाव बीड देण्यात बंद करावे अशी मागणी करत शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे . सदर आंदोलन न करता खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला.अखिल भारतीय होलार समाज संघटना, शिवसेना भोर पुणे जिल्हा, सारथी वाहतूक आकडी या संघटनांनी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी सिताराम काटे, पत्रकार अजय जाधव ,दत्तात्रय जगताप ,सोमनाथ चव्हाण, सर्जेराव कांबळे ,रुपेश कांबळे, मंथन पवार ,समीर मुलानी, रोहन कांबळे ,साजन डावरे, अक्षय चव्हाण, नारायण चव्हाणz प्रणव गवळी ,संजय खंडागळे, भैय्यासाहेब शिंदे ,नारायण कांबळे ,उमाजी जाधव ,गणेश बुधावले, ओमकार साळुंखे ,तेजस सूर्यवंशी आधी कार्यकर्ते उपोषणास उपस्थित होते





















































