पिसोळी गावचे माजी उपसरपंच गणपत शंकरराव दगडे यांच्या पत्नी स्नेहल गणपत दगडे. मा सरपंच पिसोळी तथा भाजपा जिल्हाउपाध्यक्षा महिला मोर्चा पुणे ग्रामीण आणि त्यांचा पुतण्या माऊली दगडे यांच्या जन्मदिवसानिमित्त अनावश्यक सर्व खर्च टाळून पिसोळी, दगडे वस्ती, गोकुळनगर, पद्मावती बालाजी नगर, हनुमान नगर व इतर परिसरातील गरजू मोल-मजुर करणाऱ्या १५१ कुटुंबाला शिधा व ३०० माक्स चे वाटप दगडे फार्म हाऊस येथे व घरपोच जाऊन करण्यात आले.
यावेळी, पिसोळी गावचे सामाजिक कार्यकरते सोमनाथआबा दगडे,मा ग्रा.सदस्य मारुती दगडे,भरत दगडे,मा सरपंच किरण येप्रे पाटील ,पिसोळी गावचे विध्यमान सरपंच मचिंदर दगडे,उपसरपंच दिपक धावडे,युवा नेते सचिन निबांळकर,मा ग्रा.सदस्य काळुराम धावडे ,लहू दगडे ,आकाश धावडे.गणेश दगडे ,रोहित धावडे राजु धावडे नाना धावडे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
तसेच आज जनसेवेचा ३५ वा दिवस असून रोजच्या प्रमाणेच संध्याकाळी मसाले भात व जिलेबी चे वाटप देखील करण्यात आले.